समाजसेवक अझहर पठाण यांच्या पुढाकाराने प्रभाग १८ शंभर एलईडी लाईट्सने उजळणार!”
नागरिकांच्या सहकार्याने प्रभाग उजळविण्याचा निर्धार,
धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. समाजसेवक अझहर पठाण यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून या प्रभागात शंभर एलईडी लाईट्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रभागातील अंधार, दुर्लक्षित रस्ते आणि वस्ती भाग आता तेजोमय होणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हे काम एक सामाजिक बांधिलकी म्हणून राबविले जात आहे.
या एलईडी दिव्यांसाठी लागणारे सर्व साहित्य लवकरच उपलब्ध होणार असून, ते बसविण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरु करण्यात येईल. विशेष म्हणजे, या कामासाठी कोणत्याही सरकारी निधीचा वापर न करता अझहर पठाण यांनी “स्व” खर्चातून हा उपक्रम हाती घेतला आहे, ही बाब समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
प्रभागातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्या भागात प्रकाशाची आवश्यकता आहे, तेथील नागरिकांनी लगेच संपर्क साधावा. संपर्कासाठी दोन जबाबदार कार्यकर्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत जाकेर हुसैनी : ९१७५६६८४४६, रिझवान शेख : ९७६३६४७३७३ नागरिकांनी या दोघांशी संपर्क साधून आपल्या परिसरातील गरजांची माहिती द्यावी, जेणेकरून एलईडी बसविण्याचे नियोजन अधिक अचूक होईल.
अझहर पठाण यांनी सांगितले की, “धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील प्रत्येक गल्ली प्रकाशमान असावी, हेच माझे ध्येय आहे. नागरिकांच्या सहकार्याने आपण सुरक्षित आणि सुंदर प्रभाग उभा करू शकतो.”
सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असलेले अझहर पठाण यांनी यापूर्वीही विविध सार्वजनिक उपक्रमांमधून जनसेवा केली असून, त्यांचा हा एलईडी उपक्रम येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जनकल्याणकारी आणि प्रभावी पाऊल ठरणार आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे प्रभाग १८ मधील जनतेत आनंदाचे वातावरण असून, नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे उभे राहताना दिसत आहेत.
प्रकाशाच्या माध्यमातून प्रभाग उजळविण्याचा हा उपक्रम, नागरिकांसोबतच्या थेट संवादातून साकारत असल्याने, अझहर पठाण यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे हे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण मानले जात असल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे.












