• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत

lokmadat news by lokmadat news
January 26, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
11
VIEWS

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक



७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत



धाराशिव दि.२६ जानेवारी (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली.या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

आज पोलीस कवायत मैदान क्र.२ येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थिताना संबोधित करताना सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर,नामदेव माने,श्रीपती जावळे,बाबुराव तवले,शेषराव बनसोडे,कलावती उंबरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही देशाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी असून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे व आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे,असे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,या राज्यघटनेमुळे भारत सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जात असून स्वातंत्र्य, समता,बंधुभाव व सामाजिक न्याय या मूल्यांवर देशाची उभारणी झाली आहे.जात,धर्म,लिंग वा भाषा यांचा भेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

सरनाईक पुढे म्हणाले की,राज्य सरकार मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय व सुशासन या त्रिसूत्रीवर कार्यरत असून राज्य प्रगतीपथावर आहे.आजच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची,राष्ट्रीय एकात्मता जपण्याची व आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ घ्यावी. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पर्यावरण संवर्धन,सामाजिक सलोखा व राष्ट्रप्रेम हीच उज्ज्वल भविष्यासाठी खरी ताकद असून जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व सजग नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले.

प्रारंभी पालकमंत्री सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

पालकमंत्री सरनाईक यांनी परेडचे निरीक्षण केले.पोलीस परेडचे संचलन भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती. मेघना आर्यन यांनी केले.परेडमध्ये पोलीस पुरुष- महिला,गृह रक्षक दल,एनसीसी, पोलीस बँड पथक, तुळजापूर सैनिक स्कूलचे विविध शाळांचे एनसीसी पथक तसेच स्काऊट गाईडचे पथक सहभागी झाले होते.यावेळी पोलिसांचे वज्र,शीघ्र कृती दल,श्वान कॅप्टन, बेवारस वस्तूपासून सावधान,दंगल नियंत्रण पथक,आपत्ती व्यवस्थापन दलाचा चित्ररथ,वन विभाग,कृषी विभाग,१०८ रुग्णवाहिका, अग्निशमन दल चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होते.

शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन शहरातील विविध शाळांच्या ३००० विद्यार्थ्यांनी देशभक्तीवरील गीतांवर सामूहिक कवायत सादर केली.तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम कवायत सादर केली.

यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा आणि कॉपीमुक्त जिल्ह्याची उपस्थितांना शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,संतोष राऊत,प्रवीण धरमकर,स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुंभार,जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखा अधिकारी सचिन इगे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी,नागरिक,पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन हनुमंत पडवळ यांनी केले.

SendShareTweet
Previous Post

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

Next Post

याहिया सुहेल अहमद काझी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज मध्ये ध्वजारोहण संपन्न

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

याहिया सुहेल अहमद काझी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज मध्ये ध्वजारोहण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT