अबेहोळ गावातील महिलांना तुळजापुर-अक्कलकोट तीर्थदर्शन
सरपंच मयूर लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
अबेहोळ – सरपंच मयूर लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व महिलांसाठी तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्र दर्शनाचा मोफत धार्मिक यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिला बांधवांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यात्रेच्या रवाना कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अजित (बप्पा) पिंगळे, उपसरपंच इर्शाद शेख (जुनोनी), सरपंच मयूर लोंढे, शशिकांत गायकवाड, नसरोद्दीन (बबलू) शेख, हनुमेत आवड, विलास आवड, बापु आवड, सुखदेव लोंढे, अमोल करवर, कलिम शेख, योगेश गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, सागर गायकवाड, विलास लोंढे, गणेश गायकवाड, अविनाश आवड, आनंद गायकवाड, परमेश्वर झेंडे, अभिजीत भोसले, राहुल आवड, सुरेश गायकवाड, प्रतीक आवड, कृष्णा झेंडे, विजय झेंडे, दिनेश आवड, मुसकीन शेख, चामाजी आवड, संजय आवड, संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
उपक्रमामुळे महिलांना सामाजिक-सांस्कृतिक संधी मिळून धार्मिक श्रद्धाभिवृद्धीसह एकात्मतेची भावना दृढ झाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.












