‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत धाराशिव येथे महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
धाराशिव दि.१९(प्रतिनिधी):स्त्रियांच्या आरोग्याबाबत जनजागृती करून सक्षम कुटुंब निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळा क्र. ०६, धाराशिव येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासण्या, पोषण, मातृत्व आणि बालसंगोपनाबाबत मार्गदर्शन तसेच सशक्त कुटुंब घडविण्यासाठी उपयुक्त माहिती देण्यात आली.
शिबिराला राजसिंहराजे निंबाळकर व युवानेते अक्षय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तपासणी व सेवा पुरविणाऱ्या तज्ज्ञांमध्ये डॉ. सय्यद आदिप, डॉ. गीतांजली कापसे, नोंदणीसाठी प्रतिभा देवळकर, शोभा शिंदे, रक्त नमुना तपासणीसाठी ए. यू. मगर, प्रयोगशाळा तपासणीसाठी ऋषिकेश निंबाळकर, औषध वितरणासाठी प्रणित वाघमारे, आयुष्यमान कार्ड नोंदणीसाठी प्रेमचंद वरले, समुपदेशनासाठी मुंडे एम.डी., तर आरोग्य सेविका वर्षा पाटील व नजीमा शेख यांनी कार्य केले.
प्रभागातील मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या आरोग्य जागृतीबरोबरच कुटुंब व समाज सशक्त करण्यासाठी या शिबिराचे महत्त्व अधोरेखित झाले.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












