• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

कर्नाटकातून  लातूरकडे निघालेला आयशर टेम्पो धाराशिवकडेच का वळला? 66 लाखांच्या सुपारी प्रकरणात संशय अधिक गडद!

lokmadat news by lokmadat news
April 6, 2026
in क्राईम
0
0
SHARES
859
VIEWS

कर्नाटकातून  लातूरकडे निघालेला आयशर टेम्पो धाराशिवकडेच का वळला? 66 लाखांच्या सुपारी प्रकरणात संशय अधिक गडद!

टेम्पो सापडूनही माहिती गुप्त चालकावर संशय, ट्रान्सपोर्ट कंपनी आक्रमक – पोलीस भूमिकेवर प्रश्नचिन्ह

धाराशिव | लोकमदत न्यूज

66 लाखांच्या सुपारीसह टेम्पो चोरी प्रकरणात आता नवे धक्कादायक पैलू समोर येत असून, संपूर्ण घटनेभोवती संशयाचे सावट अधिक गडद होत चालले आहे. कर्नाटकातील काऊ पुतूर आणि केरळमधील कासारगोड येथील डेपोमधून इंडोआर्या सेंट्रल ट्रान्सपोर्ट लिमिटेडमार्फत सुपारी घेऊन लातूरकडे निघालेला टेम्पो धाराशिवकडे का वळविण्यात आला, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेम्पोला कर्नाटक ते लातूर दरम्यान बसवकल्याण–निलंगा–औसा किंवा उमरगा–औसा असा सरळ मार्ग उपलब्ध असताना, तो धाराशिव शहरात कसा पोहोचला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे चालकाचे मूळ गाव धाराशिवमध्येच असताना, घरापासून अवघ्या 1 ते 1.5 किमी अंतरावर असलेल्या हॉटेलसमोर वाहन उभे करण्यामागचा हेतू काय, यावरही संशय व्यक्त केला जात आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, हा टेम्पो गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असल्याची माहिती मिळत असूनही, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. टेम्पो नेमका कुठे सापडला, त्यातील सुपारीपैकी किती माल शाबूत आहे, किती चोरीला गेला, आणि तो कुठे व कोणी विकला  याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप मौन पाळले गेले आहे.
या संदर्भात आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांनी पोलिस भरती बंदोबस्तात आहे उद्या सविस्तर माहिती देतो अशी माहिती दिली.
दरम्यान, ही बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून आनंदनगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले असून, त्यांनी चालकावर संशय व्यक्त करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नसल्याने ते हतबल झालेले दिसत आहेत.
ट्रान्सपोर्ट कंपनीच्या प्रतिनिधींनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काही लोकांना अभय देण्यासाठीच सदरील गुन्हा विशिष्ट पद्धतीने नोंदवण्यात आला असावा. त्यामुळे ते सोमवारी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमदत न्यूज’शी बोलताना सांगितले.
एकूणच, 66 लाखांच्या या प्रकरणात अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले असून, चोरी की बनाव याबाबत संशय अधिकच बळावत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्वतः लक्ष घालून निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा अशा घटनांमुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भाग तीन…. अधिक वस्तुनिष्ठ माहितीसह भाग चार लवकरच


लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#पोलिस अधीक्षक धाराशिव
SendShareTweet
Previous Post

बेंबळी गावात अनधिकृत लाकूड कापणीचे स्वा मिल मशीन सुरू? वनविभाग झोपेत की ‘आशीर्वाद’?

Next Post

युवा नेतृत्वाचा सन्मान:  प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अभिजित (भैय्या) चव्हाण यांची फेरनिवड

Related Posts

क्राईम

उपळा (मा)येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा संताप एसपी कार्यालयासमोर मृतदेहासह दोन तास रास्ता रोको

April 13, 2026
क्राईम

महाकाली कला केंद्रावर गुंडांचा हल्ला महिलांना मारहाण करीत तोडफोड व लूट लाखोंचे नुकसान, येडशी येथील सुनील शेळकेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

April 12, 2026
क्राईम

येडेश्वरी यात्रेत लुटमार करणारी टोळी ९.३० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

April 12, 2026
क्राईम

ग्रामसेवकांच्या बनावट शिक्क्यांच्या आधारे इमारत बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदी रद्द करण्याची रिपाइं (खरात) ची मागणी

April 6, 2026
क्राईम

66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई  5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात

April 6, 2026
क्राईम

बेंबळी गावात अनधिकृत लाकूड कापणीचे स्वा मिल मशीन सुरू? वनविभाग झोपेत की ‘आशीर्वाद’?

April 4, 2026
Next Post

युवा नेतृत्वाचा सन्मान:  प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अभिजित (भैय्या) चव्हाण यांची फेरनिवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT