• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

ग्रामसेवकांच्या बनावट शिक्क्यांच्या आधारे इमारत बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदी रद्द करण्याची रिपाइं (खरात) ची मागणी

lokmadat news by lokmadat news
April 6, 2026
in क्राईम
0
0
SHARES
173
VIEWS

ग्रामसेवकांच्या बनावट शिक्क्यांच्या आधारे इमारत बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदी रद्द करण्याची रिपाइं (खरात) ची मागणी

धाराशिव – लोकमदत न्यूज

जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदी ग्रामसेवक यांचे बनावट शिक्के तयार करून व सह्या मारून बांधकाम कामगार असल्याच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना शासनाचे लाभ देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करून त्या नोंदी रद्द करण्यासह देण्यात येत असलेला लाभ तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.६ एप्रिल रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव व कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामसेवकांचे बनावट शिक्के व सह्या वापरून बांधकाम कामगारांच्या नोंदणी करण्यात आल्या असल्याचा संशय आहे. धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी, वलगुड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी व शिंगोली तसेच कळंब तालुक्यातील पानगाव, मोहा, लोहटा (पूर्व) व उपळाई या गावांमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला जात असल्याची शक्यता आहे. ग्रामसेवकांच्या अधिकृत शीक्के व सह्यांची नक्कल करून तयार करण्यात आलेली कागदपत्रे बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी वापरली जात असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. या बनावट प्रकारामुळे आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार वाढीस लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सर्व गावातील ग्रामसेवकांच्या शिके व सह्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. आतापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या बांधकाम कामगार नोंदणीची काटेखोर पडताळणी करून बोगस प्रमाणपत्रे तयार करणारे व त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. महत्वाची म्हणजे भविष्यात अशाप्रकारे आळा घालण्यासाठी आवश्यक ती नियंत्रण यंत्रणा उभारण्यात यावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात अशी मागणी राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई  5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात

Next Post

धाराशिव बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

Related Posts

क्राईम

उपळा (मा)येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा संताप एसपी कार्यालयासमोर मृतदेहासह दोन तास रास्ता रोको

April 13, 2026
क्राईम

महाकाली कला केंद्रावर गुंडांचा हल्ला महिलांना मारहाण करीत तोडफोड व लूट लाखोंचे नुकसान, येडशी येथील सुनील शेळकेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

April 12, 2026
क्राईम

येडेश्वरी यात्रेत लुटमार करणारी टोळी ९.३० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

April 12, 2026
क्राईम

66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई  5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात

April 6, 2026
क्राईम

कर्नाटकातून  लातूरकडे निघालेला आयशर टेम्पो धाराशिवकडेच का वळला? 66 लाखांच्या सुपारी प्रकरणात संशय अधिक गडद!

April 6, 2026
क्राईम

बेंबळी गावात अनधिकृत लाकूड कापणीचे स्वा मिल मशीन सुरू? वनविभाग झोपेत की ‘आशीर्वाद’?

April 4, 2026
Next Post

धाराशिव बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT