धाराशिव मनसेची महत्वाची बैठक; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
धाराशिव : लोकमदत न्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) धाराशिव जिल्ह्याचे नवनिर्वाचित संपर्क अध्यक्ष, मनसे नेते मा.बाबू वागसकर हे दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक शिंगोली रेस्ट हाऊस येथे सायंकाळी 5 वाजता पार पडणार असून, संघटनात्मक कामकाज व आगामी नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे धाराशिव शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी केले आहे
या बैठकीमुळे मनसेच्या जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीस चालना मिळणार असून, आगामी काळातील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक महत्वाची ठरणार आहे..!
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













