• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

lokmadat news by lokmadat news
April 10, 2026
in राजकारण
0
0
SHARES
1.6k
VIEWS

धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

खासदार-आमदारांच्या विश्वासूंची ‘कमळ’कडे वाटचाल जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विद्यमान चार नगरसेवकांसह एकूण पाच नगरसेवक लवकरच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
हे सर्व नगरसेवक खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र, आता त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात भाजपची वाढती ताकद आणि युवा नेतृत्व म्हणून मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची आक्रमक भूमिका यामुळे हे नगरसेवक प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील विकासनिधी खेचून आणण्यासाठी आणि सत्तेच्या केंद्राशी जवळीक वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, या पक्षप्रवेशाची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराशी निष्ठा असलेल्या एका विश्वासू नेत्यावर सोपविण्यात आली आहे. या नेत्याने ठाकरे सेनेच्या एका नगरसेवकासोबत मुंबई येथे जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, पाच नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाचा प्रवेश आमदार पाटील यांनी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उर्वरित पाचव्या नगरसेवकाची निवड कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम नाव निश्चित होताच पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे समजते.
या घडामोडींमुळे धाराशिवच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण निर्णायक ठरणार आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #कैलास पाटील #देवेंद्र फडणवीस #अजित पवार#टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#धाराशिव #उस्मानाबाद#प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवार
SendShareTweet
Previous Post

नळदुर्गमध्ये शाळा विलीनीकरणाच्या निर्णयाचा कडाडून विरोध; संतप्त पालकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन!

Next Post

काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार

Related Posts

राजकारण

धाराशिव मनसेची महत्वाची बैठक; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

April 12, 2026
राजकारण

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

April 11, 2026
राजकारण

काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार

April 10, 2026
राजकारण

धाराशीवमध्ये काँग्रेसला jabar धक्का विद्यमान दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

April 9, 2026
राजकारण

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राजकीय आखाडा पेटला !आनंद पाटलांनी किरण गायकवाड मा.आमदार यांना अंतर दाखवले

April 8, 2026
राजकारण

जिल्हा नियोजनातील निधी वाटपामध्ये अनियमितता मान्यतेशिवाय कामांना हिरवा कंदील लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – आ. कैलास पाटील

April 8, 2026
Next Post

काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT