• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

महाकाली कला केंद्रावर गुंडांचा हल्ला महिलांना मारहाण करीत तोडफोड व लूट लाखोंचे नुकसान, येडशी येथील सुनील शेळकेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

lokmadat news by lokmadat news
April 12, 2026
in क्राईम
0
0
SHARES
1.1k
VIEWS

महाकाली कला केंद्रावर गुंडांचा हल्ला महिलांना मारहाण करीत तोडफोड व लूट ८.१० लाखांचे नुकसान, येडशी येथील सुनील शेळकेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

धाराशिव | लोकमदत न्यूज

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर सशस्त्र हल्ला करत मारहाण, तोडफोड व लूटमार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अन्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण नुकसान अंदाजे ८ लाख १० हजार रुपये इतके असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
फिर्यादी कशिष राजेश शेरकर (वय २०, रा. इंगळे गल्ली, धाराशिव, सध्या मुक्काम महाकाली कला केंद्र, चोराखळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या महाकाली सांस्कृतिक कला केंद्र पार्टी मालकीण म्हणून काम करत असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता, त्या आपल्या रूममध्ये असताना अचानक काही आरोपी वाहनाने येऊन केंद्रासमोर थांबले. सुनील शेळके, जयंत भोसले, नागेश लोखंडे, हनुमंत शेळके, योगेश चव्हाण, दिनेश चव्हाण, सोनू पवार (सर्व रा. येडशी) व अन्य ५ ते ६ अनोळखी व्यक्तींनी केंद्रात घुसून नर्तिकांवर मारहाण करण्यास सुरुवात केली.
या गोंधळात जयंत भोसले याने कामगार महादेव सिद्धाराम पवार याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर आरोपींनी रूम च्या खिडक्या फोडून दरवाजा तोडत आत प्रवेश केला. फिर्यादीच्या आई रेखा शेरकर यांना केसाने ओढून मारहाण करण्यात आली. फिर्यादीलाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
आरोपींनी कोयता व तलवारीच्या धाकावर घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यामध्ये कार्डिओ मशीन, रनिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, एसी, कपाट तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, ७० प्लास्टिक खुर्च्या, पाण्याचे जार, लाईट बल्ब व इतर साहित्य फोडण्यात आले. तसेच कपाटातून सुमारे २ लाख रुपये रोख रक्कम, ५ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट व १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लंपास करण्यात आली.
याशिवाय पार्किंगमध्ये उभी असलेली महिंद्रा XUV 500 (MH-14 DN 6809) या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या सर्व प्रकारात एकूण सुमारे ८.१० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी स्वप्निल भोजगुडे हे करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेरकर यांनी केली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #कैलास पाटील #देवेंद्र फडणवीस #अजित पवार#टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#धाराशिव #उस्मानाबाद#पोलिस अधीक्षक धाराशिव#प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारCIDcmocrimedharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad praksah abitakardharashiv policedharashiv sp
SendShareTweet
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

Next Post

उपळा (मा)येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा संताप एसपी कार्यालयासमोर मृतदेहासह दोन तास रास्ता रोको

Related Posts

क्राईम

उपळा (मा)येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा संताप एसपी कार्यालयासमोर मृतदेहासह दोन तास रास्ता रोको

April 13, 2026
क्राईम

येडेश्वरी यात्रेत लुटमार करणारी टोळी ९.३० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

April 12, 2026
क्राईम

ग्रामसेवकांच्या बनावट शिक्क्यांच्या आधारे इमारत बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदी रद्द करण्याची रिपाइं (खरात) ची मागणी

April 6, 2026
क्राईम

66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई  5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात

April 6, 2026
क्राईम

कर्नाटकातून  लातूरकडे निघालेला आयशर टेम्पो धाराशिवकडेच का वळला? 66 लाखांच्या सुपारी प्रकरणात संशय अधिक गडद!

April 6, 2026
क्राईम

बेंबळी गावात अनधिकृत लाकूड कापणीचे स्वा मिल मशीन सुरू? वनविभाग झोपेत की ‘आशीर्वाद’?

April 4, 2026
Next Post

उपळा (मा)येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा संताप एसपी कार्यालयासमोर मृतदेहासह दोन तास रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT