• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

lokmadat news by lokmadat news
April 12, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
46
VIEWS

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

नगराध्यक्षा सौ नेहाताई काकडे यांनी धाराशिवसियांच्या वतीने मानले धन्यवाद

धाराशिव: धाराशिव शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या’ दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. आपण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ नेहाताई काकडे यांनी धाराशिव वासियांच्या वतीने उपमुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद मानले आहेत.

नगराध्यक्ष सौ. नेहा काकडे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री महोदयांना धाराशिव नगर परिषदेअंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे मागणी पत्र दिले होते. यामध्ये शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, उद्यान निर्मिती आणि नाट्यगृह दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या 9 कामांचा समावेश होता.
या मागणीची दखल घेत, विशेषतः शहरातील कलावंत आणि रसिकांची सोय विचारात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी शिंदे साहेबांनी तात्काळ जाहीर केला आहे. धाराशिव नगर परिषद ही ‘अ’ वर्ग नगर परिषद असून शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. नाट्यगृहाची अवस्था पाहता त्याच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. आमच्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा निधी मंजूर केला आहे. याबद्दल संपूर्ण धाराशिव शहरवासियांच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद मानत या भरीव निधीमुळे आता नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल असा विश्वास नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेल्या पत्रात एकूण १२८.५० कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन प्रक्रियेसाठी ११ कोटी, स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पासाठी ९ कोटी, अमृत २.० योजनेच्या स्वहिस्सासाठी २४ कोटी, अग्निशामक व्यवस्थेच्या बळकटी करणासाठी रु ४.५० कोटी आणि नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते विकास कामांसाठी २१ कोटी रुपयांच्या मागणीचा यात समावेश आहे. नाट्यगृहासाठी केलेल्या मागणीला यश आले असून निधी मंजूर झाल्यामुळे इतरही विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी व्यक्त केला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #कैलास पाटील #देवेंद्र फडणवीस #अजित पवार#टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#धाराशिव #उस्मानाबाद
SendShareTweet
Previous Post

धाराशिव मनसेची महत्वाची बैठक; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

महाकाली कला केंद्रावर गुंडांचा हल्ला महिलांना मारहाण करीत तोडफोड व लूट लाखोंचे नुकसान, येडशी येथील सुनील शेळकेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026
सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026
सामाजिक

संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

April 10, 2026
सामाजिक

आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा – गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन

April 8, 2026
सामाजिक

बत्तिसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन  धाराशिव मध्ये होणार – डॉ. शरद गोरे

April 8, 2026
सामाजिक

April 4, 2026
Next Post

महाकाली कला केंद्रावर गुंडांचा हल्ला महिलांना मारहाण करीत तोडफोड व लूट लाखोंचे नुकसान, येडशी येथील सुनील शेळकेंसह अनेकांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT