येडेश्वरी यात्रेत लुटमार करणारी टोळी ९.३० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
धाराशिव | लोकमदत न्यूज
येडेश्वरी यात्रेदरम्यान यात्रेकरूंना लक्ष्य करून लुटमार व मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ०१ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट २०२६ दरम्यान येडेश्वरी यात्रेत यात्रेकरूंना अडवून लुटमार करण्याच्या तसेच वाहन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपावर यांच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ३ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपल्या साथीदारांसह यात्रेकरूंना रस्त्यात अडवून लुटमार केल्याची तसेच मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आळणी शिवार व कुसंब-धानोरा रोड परिसरात जबरी चोरी केल्याचेही त्यांनी उघड केले.
या आरोपींकडून पोलिसांनी दोन सोन्याचे दागिने, ९ मोबाईल फोन व २ मोटारसायकली असा एकूण ९.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे २ जबरी चोरी व २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आनंद श्यामराव पवार (वय २७), शुभम श्यामराव पवार (वय २१) व बबन शहाजी काळे (वय २८) यांचा समावेश असून इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपाव,.पो. नि. सुदर्शन कासार, पो. ह. शौकत पठाण, पो. ह.प्रकाश औताडे, पो. ह. जावेद काझी, पो. ह. फरहान पठाण, चा. पो. ह.नवनाथ गुरव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












