• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

नियमित पाणीपुरवठ्यासाठी सभापती विलास (बापू) लोंढे यांचे सकारात्मक पाऊल पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

lokmadat news by lokmadat news
March 8, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
77
VIEWS

नियमित पाणीपुरवठ्यासाठी सभापती विलास (बापू) लोंढे यांचे सकारात्मक पाऊल पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वात प्रशासन सक्रिय दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेत पाणीपुरवठा सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच विलास (बापू) लोंढे यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या असून, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासनही या कामासाठी सक्रिय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याच्या विविध समस्या, अडचणी व उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सध्या धाराशिव शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत असून विविध तांत्रिक अडचणींना तोंड देत शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वीज विभागातील तांत्रिक बिघाड, रस्त्यांवरील सुरू असलेली विकासकामे तसेच पाइपलाईन फुटण्याच्या घटनांमुळे काही वेळा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याची माहिती बैठकीत समोर आली. या सर्व बाबींचा सखोल आढावा घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सभापती विलास (बापू) लोंढे यांनी दिल्या.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या सहकार्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सभापती विलास लोंढे यांनी स्पष्ट केले. शहरात दोन ते तीन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही सभापती लोंढे यांनी दिली.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची टंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करणाऱ्या वॉलमन यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली असून त्यांनी आपल्या विभागातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती द्यावी, पाणी कधी येणार याची पूर्वकल्पना नागरिकांना द्यावी, तसेच शक्यतो दिवसाच्या वेळेतच पाणीपुरवठा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांशी आपुलकीने संवाद साधून पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्याचे निर्देशही सभापती लोंढे यांनी दिले.
शहरात सुरू असलेली अटल अमृत २ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर धाराशिवकरांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, सहाय्यक अभियंता रोहित मुंडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वॉलमन उपस्थित होते.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार प्रकरणात आरोपीस सत्र न्यायालयाचा जामीन

Next Post

महिला दिनानिमित्त नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Related Posts

महाराष्ट्र

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026
महाराष्ट्र

धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

April 8, 2026
महाराष्ट्र

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण राठोड यांना जाहीर -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

April 7, 2026
महाराष्ट्र

धाराशिव बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

April 7, 2026
महाराष्ट्र

गरिबीवर मात करत सारोळ्याचा गणेश वडलीक पुणे पोलीस दलात भरती… मातंग समाजाकडून भव्य सत्कार

April 5, 2026
महाराष्ट्र

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

April 1, 2026
Next Post

महिला दिनानिमित्त नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT